"अरेंज मॅरेज......एक ब्लाइण्ड गेम"
"अरेंज मॅरेज......एक ब्लाइण्ड गेम" पत्त्यांची
जशी नेहमी "ब्लाइण्ड गेम" असते
तशी ठरवून केलेल्या लग्नाचीही असते......
तो-तिला नि ती-त्याला ओळखतही नसते
वीसेक लोकांत ओळख पाटलेलिही नसते....
होकार असाच एका नजरेत द्यायचा असतो
बाकी सर्व नशिबवर सोडून द्यायचे असते...
कहीना कधी कधी असाच गुलामही मिळतो
तर कहीना कधी हुकूमि एक्का लाभतो....
काहीच्या नशिबी मात्र दुररी-तीर्री च येते
कारण ही एक "ब्लाइण्ड गेम" असते....
येईल त्या पत्ताने खेळून दाखवायाचे असते
जिंकून हरण्यापेक्षा,हारून जिंकायचे असते....
कारण "ब्लाइण्ड" जरी असली
तरी ही आयुष्याची "गेम" असते...
Wednesday, July 23, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
nice poem
Post a Comment